InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला बारामतीत शरद पवार यांच्या निवासस्थाना समोर सकाळी 9 पासून मराठा समाजाचा ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अजित पवार देखील आंदोलनात सहभागी होऊन आंदोलकांसमवेत घोषणा देत आहेत. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला होता. दोन वर्षांपूर्वी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक वगळता इतर सर्व जिल्ह्यात बंद सुरु झाला आहे.

दरम्यान आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यातही सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरील बस सेवा बंद असून संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. काल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आज शहरात मराठा युवकांची मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.