गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नाही, प्रविण दरेकरांचा संजय राऊतांना टोला

मुंबई : भाजपला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग व्हावा यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र संजय राऊत यांच्या एकत्र लढण्याच्या विचाराला काँग्रेसने धक्का दिला आहे. काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी करून गोव्यात महाविकास आघाडीच्या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात काँग्रेसला अजिबात रस नसल्याचे स्पष्ट होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून भाजपाला धूळ चारू शकतात, असा दावा संजय राऊत सातत्याने करत होते. मात्र काँग्रेस याला फारसा प्रतिसाद देताना दिसत नाही. यानंतर गोवा विधानसभा निवडणुकीवरूनच भाजप शिवसेनेवर टीका करत आहे तर शिवसेना भाजपवर. मात्र यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नसल्याचे वक्तव्य दरेकर यांनी केले आहे. अशातच संजय राऊत हे स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याआधी रुपाली पाटील यांनी खूप समजून घ्यावे लागेल. रुपाली पाटील यांनी गोव्याच्या आधी महाराष्ट्राचा अभ्यास करावा असे दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा