InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

जाफ्राबाद तालुक्यात दोन सख्ख्या बहिणींचा तळ्यात बुडून मृत्यू

दोन सख्ख्या बहिणींचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. जाफ्राबाद तालुक्यात ही घटना घडली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावकरी धावून आले. मात्र तोपर्यंत या दोघींनीप्राण सोडले होते. शाळा सुटल्यानंतर या दोघी तळ्याजवळ खेळायला आल्या होत्या.

जाफराबाद तालुक्यातील येवता शिवारात शनिवारी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास घडली. येवता येथील मोळ नावाच्या तळ्यांभोवती दोन बहिणी खेळत होत्या. शाळेला दुपारून सुट्टी असल्यामुळे कीर्ती आणि संस्कृती या दोन बहिणी आपल्या शेळ्या चारत होत्या. यावेळी किर्ती दळवी हिचा आचकपणे पाय घसरला. तीने आरडाओरड केली तेव्हा तिची बहीण तिच्या मदतीला धावून आली. संकटात सापडलेल्या बहिणीला मदत करताना संस्कृती (वय 12 वर्षs) हिचासुद्धा दुर्दैवाने पाण्यात तोल गेला आणि ती सुद्धा पाण्यात पडली.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply