मलायकाच्या प्रेमात अर्जुन कपूरने केला तब्बल ‘एवढ्या’ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा सध्या त्यांच्या नात्यामुळं चर्चेत आले आहेत. दोघेही बऱ्याचदा पार्टी फंक्शन्स आणि व्हेकेशनला एकत्र दिसतात. दरम्यान अर्जुन कपूरने मलायकाच्या घराजवळच सी-फेसिंग व्हिला खरेदी केला असल्याची माहिती मिळाली आहे.

अर्जुन कपूरने मलायकाच्या घराजवळच 4 बीएचके (BHK) सी- फेसिंग घर खरेदी केलं आहे. हे घर वांद्र्यामध्ये मलायकाच्या घराजवळच आहे. 26 व्या मजल्यावर असलेल्या या घराची किंमत 20 ते 23 कोटी रुपयांदरम्यान आहे.

अर्जुन कपूरने मलायकाच्या प्रेमामध्ये महागडे घर घेऊन एक प्रकारे त्यांच्या प्रेमाची कबुलीच दिली आहे. आता दोघंही जवळ राहायला आले असले तरी एकाच घरात एकत्र कधी राहतात, याची मात्र त्यांच्या चाहत्यांना जास्त उत्सुकता लागली आहे.

दरम्यान मालायकाने एक शोच्या दरम्यान तिला पुन्हा आई व्हायची इच्छा असल्याचे सांगितले होते. मलायकाला १९ वर्षांचा मुलगा आहे. मुलाचे नाव अरहान खान आहे. मात्र यावेळी तिला मुलगी हवी असल्याचे तिने स्पष्ट केले होते. तिच्या आजूबाजूला सगळे पुरुष आहेत. मुलीची ओढ असल्यामुळे तिच्यासोबत मेकअप, कपडे, शूज शेअर करण्याची इच्छा मलायकाने व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा