नागपुरात महिला राष्ट्रवादीतर्फे प्रवीण दरेकरांच्या फोटोला चपलांचा हार

नागपुर : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला.

तसेच या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यानंतर आता मात्र दरेकरांच्या या वक्तव्यावर राज्यातील राजकारण चांगलाच पेटलय. तसेच प्रविण दरेकरांना टीकेचा सामना करावा लागत आहे. दरेकरांविरोधात राष्ट्रवादी महिला आक्रमक झाल्या आहेत. महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी दीक्षाभूमी चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी दरेकर यांच्या फोटोला चपलांचा हार घालत निषेध नोंदविण्यात आला. दरेकर यांच्या या विधानावर रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांचं हे विधान महिलांचा अवमान करणारं आहे. प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा. नाही तर आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा