पुण्यात चक्क 1 रुपया लिटर पेट्रोल ‘हे’ आहे कारण

पुणे : राज्याचे उपमुख्यमंंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज पुण्यात एक अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आला. भाजपला टोमणा देण्यासाठी चक्क अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात 1 रूपया प्रतिलीटर पेट्रोल वाटप केलं गेलं.

पुण्यात धानोरीमध्ये जाणता राजा प्रतिष्ठान आणि शशिंकात टिंगरे यांच्या पुढाकाराने एक रुपयात 1 लीटर पेट्रोल दिलं गेलं. पेट्रोल -डिझेलच्या किंमतीने सामान्य माणूस वैतागला आहे. यामुळे राज्यात 107 रूपये प्रतिलीटर पेट्रोल झालं असताना केंद्र सरकारला चपराक देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

दरम्यान, कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी रक्तदान किंवा आरोग्य तपासणी शिबिरे घेऊन वाढदिवस साजरा करत कार्यकर्ते, शुभचिंतकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा