सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये, अभिनेत्री अनन्या पांडेची जीभ घसरली

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिचा आगमी चित्रपट ‘पती, पत्नी और वो’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. नुकतीच अनन्या पांडे, कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर यांनी सलमान खानचा लोकप्रिय रिअलिटी शो ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावली. त्यावेळी सलमान खाननं दिलेल्या एका टास्कमध्ये अभिनेत्री अनन्या पांडेची जीभ घसरलेली दिसली. बिग बॉसच्या घरात ‘मैं पॉर्न चाहती हूँ’ असं म्हणतानाचा तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.

ज्यात कानाला हेडफोन लावून हाय व्हॉल्यूम म्युझिक सुरू असताना समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे त्याच्या लिपसिंक वरून ओळखायचं. यावेळी अनन्याला हेडफोन देण्यात आले आणि नंतर सलमान म्हणाला ‘बिग बॉस चाहते हैं’. मात्र याचं उत्तर देताना अनन्या म्हणाली, ‘मैं पोर्न चाहती हूँ’. अनन्याचं उत्तर ऐकून कार्तिक म्हणाला, ‘हा ती खूप पाहते’ यावर तिथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच हसू आवरेना.अनन्यानं म्युझिक ऐकताना सलमान काय बोलतो आहे हे ओळखण्याचा 6 वेळा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी तिनं चुकीचं उत्तर दिलं. मात्र सलमानला हेडफोन देऊन अनन्या काय बोलत आहे हे सलमाननं एकाच प्रयत्नात ओळखलं. यामध्ये सर्वांमध्ये लिपसिंक ओळखण्यात सरस ठरला.

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.