बाजीरावच्या शोधात राखी सावंत पोहचली ‘इंडियन आयडल’च्या सेटवर 

मुंबई : अभिनेत्री राखी सावंतने बिग बॉसच्या घरामध्ये धम्माल उडवल्यानंतर आता ‘इंडियन आयडल १२’ कार्यक्रमाच्या सेटवर जाऊन धडकली आहे. ही माहिती खुद्द राखीनेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करून दिली आहे. राखीचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

राखीने एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती म्हणते, ”मी इंडियन आयडल १२ च्या सेटवर पोहचली आहे. येथे येऊन मी खूपच उत्साहित झाली आहे. मला खूप मजा येते आहे. लवकरच मी सहभागी झालेला भाग प्रसारित होणार आहे. तुम्ही देखील हे पाहण्यासाठी उत्सुक असाल ना? तर मग तयार रहा… आमचा इंडियन आयडल कार्यक्रम पाहण्यासाठी.” असे या व्हिडिओमध्ये राखी बोलली आहे.

राखीने तिचे सेटवरचे अनेक फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यात ती गायिका सोनू कक्कड, अनु मलिक आणि कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण यांच्यासोबत दिसते आहे. राखीला पाहून तिचे चाहते खूपच आनंदीत आणि उत्साहित झाले आहेत. राखीच्या या सर्व फोटोंवर ते भरभरून कॉमेंट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा