InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार

येत्या सप्टेंबर महिन्यात भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात राफेल विमान दाखल होणार आहे. शिवाय दोन वर्षांच्या आत सर्व 36 राफेल विमानं भारताला मिळणार आहेत. फ्रान्स कंपनी दसॉल्ट एव्हिएशन राफेल विमानांची निर्मिती करत असून अत्याधुनिक अशा 2 इंजिनांनी राफेल विमान युक्त आहे.

पहिलं राफेल विमान येत्या सप्टेंबर महिन्यात भारताला मिळेल, असं संरक्षण उत्पादक विभागाचे सचिव अजय कुमार यांनी पीटीआयला सांगितलं. तसेच फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झँडर जीगलर यांनीही सांगितलं होतं की, अपेक्षित वेळेच्या आधी राफेल विमानं भारताला मिळतील. त्यामुळे भारताला राफेल विमान दोन महिने आधीच मिळणार आहे.

भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीकडून एकूण 36 विमानांची खरेदी केली आहे. पुढील दोन वर्षांना हे सर्व  विमानं भारतीय वायू दलाच्या ताफ्यात दाखल होतील. राफेल विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर हल्ला करण्यात सक्षम आहे. तसेच या विमानमध्ये आण्विक अस्त्रांचा वापर करण्याचीही क्षमता आहे.

राफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावरुन राहुल गांधी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply