विधानसभा निवडणुकीत महायुती 240 ते 250 जागांवर विजयी होईल : रामदास आठवले

विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांमध्ये महायुती होणारच आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये छोट्या गोष्टींवरुन वाद न होता ही निवडणूक एकत्र लढवणे गरजेचं असल्याचं मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.

दोन्ही पक्षांनी आपल्या शक्तीप्रमाणे जागावाटपाची चर्चा केली पाहिजे. महायुतीमध्ये 18 जागा मित्र पक्षाला मिळणार आहेत. त्यापैकी 10 जागांवर आरपीआय निवडणूक लढणार आहे. येत्या दोन दिवसात भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या जागा जागावाटपासंदर्भात चर्चा व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. विधानसभा निवडणुकीत 240 ते 250 जागांवर आमचा विजय होईल, असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.