InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

औरंगाबादेत 4 शाळांवर प्राप्तिकर विभागाच्या धाडी

प्राप्तिकर विभागाने बुधवारी शहरातील सीबीएसई माध्यमाच्या 4 शाळांवर एकाच वेळी छापे टाकले. या शाळांची वार्षिक उलाढाल प्रत्येकी ४ ते ५ कोटी रुपयांची असतानाही संस्थाचालक प्राप्तिकर विवरणपत्र भरत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले होते.

आयकर विभागाच्या 4 पथकांनी हे छापे टाकले असून यात चिकलठाणा परिसरातील पीएसबीए इंग्लिश स्कूल (चिकलठाणा), रॉयल ओक्स वर्ल्ड स्कूल (देवळाई), ऑर्किड इंग्लिश स्कूल (वाळूज) व ऑइस्टर इंग्लिश स्कूल (जालना रोड) या शाळांचा समावेश आहे. मागच्या अनेक दिवसांपासून प्राप्तिकर विभागाचे या शाळांच्या कारभारावर लक्ष होते, अशी माहिती असून अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply