InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी स्टेन स्वामींच्या घराची झाडाझडती

- Advertisement -

आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या फादर स्टेन स्वामी यांच्या निवासस्थानाची भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी झारखंडमध्ये पोलिसांनी दुसऱ्यांदा झाडाझडती घेतली. पोलिसांनी स्टेन यांच्या घरातील डिजिटल उपकरण आणि अन्य काही महत्वाचा दस्तावेज जप्त केला आहे.

एल्गार परिषदेत झारखंडमधील मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी हे देखील उपस्थित होते.

- Advertisement -

पुणे पोलिसांचे पथक सोमवारी रात्री झारखंडमध्ये पोहोचले. मंगळवारी पोलिसांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला. पोलिसांनी स्वामी यांच्या घरातून डिजिटल उपकरण आणि अन्य महत्त्वपूर्ण दस्तावेज जप्त केला आहे. स्टेन स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांनी वर्षभरात दुसऱ्यांदा छापा टाकला आहे. यापूर्वी ऑगस्ट २०१८ मध्येही पोलिसांनी स्टेन स्वामी यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांनी स्टेन स्वामी यांच्या घरातून लॅपटॉप, पेनड्राइव्ह, सीडी आणि मोबाइल जप्त केले होते.

मूळचे केरळमधील रहिवासी आहेत. झारखंडमध्ये नक्षलींशी संबंध असल्याच्या खोट्या आरोपांवरुन तुरुंगात टाकलेल्या आदिवासींच्या सुटकेसाठी स्वामी स्टेन काम करतात, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.