InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

येत्या विधानसभा निवडणुकीत भावा विरुद्ध भाऊ; होणार चुरशीची लढत

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे वाडा-शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी मुंबईतील शिवसेना भवनात आज (10 जुलै) पक्षप्रवेश केला. पण पांडुरंग बरोरा यांच्या शिवसेनेत जाण्याला त्यांचे सख्खे चुलत बंधू भास्कर बरोरा यांनी कडाडून विरोध केला होता.

“जर त्यांना शिवसेनेतून उमेदवारी मिळाली, तर मी स्वत: त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी अर्ज दाखल करेन असे भास्कर बरोरा यांनी सांगितले आहे.” यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूरमध्ये भावा विरुद्ध भाऊ अशी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Loading...

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बरोरा यांना शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. बरोरा यांच्या पक्षप्रवेशासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले गेले होते.

- Advertisement -

Loading...

ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला राजीनामा. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा देण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेल्या जवळकीमुळे आमदार पांडुरंग बरोरा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.