येणाऱ्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल – राम कदम

भाजपाची आज संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीतून संघटना वाढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या वेळेस मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत आमच्या एक ते दोन जागा कमी आल्या होत्या. मात्र, येणाऱ्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असेल अस वक्तव्य भाजप नेते राम कदम यांनी केलं आहे. तसेच ठेकेदारांनी येऊन भेटावे म्हणून सरकार प्रकल्प थांबवत आहे.

गेल्या पाच वर्षातील विकास कामांना स्थगिती देऊन महाविकास आघाडी कंत्राटदार आपल्याकडे येण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. विकास कामांना स्थगिती देणे चुकीचे. खाते वाटप, विस्तार झाले तर मोठा गट बाहेर पडेल ही भीती सरकारला आहे. हे सरकार संभ्रवस्ता सरकार आहे. महाविकास आघाडी नाही तर हे बिघाडी सरकार आहे. तसेच ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे भाजपचे नेते आहेत. तसेच ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. अस म्हणत त्यांनी इतर चर्चांना ब्रेक लावले आहेत

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.