‘मुख्यमंत्री आमचाच होणार असे स्वप्नात पण बडबडायचो’; संजय राऊत यांनी सांगितला सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव

“मी रोज सकाळी उठलो की, स्वप्नात पण बडबडायचो, मुख्यमंत्री आमचाच होणार”, शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील थरारक सत्तासंघर्षाचा अनुभव सांगताना हे वक्तव्य  केले.

“मी रोज सकाळी उठलो की, स्वप्नात पण बडबडायचो. मुख्यमंत्री आमचाच होणार. मला घरी बोलायचे वेड लागलं आहे का? सामनामध्ये आलो की चिंता करु नका, मुख्यमंत्री आमचाच होणार. बाहेर गेलो तरी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार असे सांगायचो. शेवटपर्यंत ही गोष्ट आपण पुढे नेली. हा सिनेमा म्हणा किंवा एक भयपट म्हणा. रोमांचक किंवा रहस्यपट म्हणा.” असेही ते यावेळी म्हणाले.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या दिल्लीतील निवास्थानी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांचा एकत्र स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्नेह भोजनावेळी सर्व खासदारांच्या आग्रहाखातर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडद्यामागील सत्तासंघर्षाचा थरारक अनुभव सांगितला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली याबाबतही अनेक किस्से सांगितले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.