‘भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल’; पडळकरांचा गौप्यस्फोट

नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गोपीचंद पडळकर हे सुद्धा भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी आता थेट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. पडळकरांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ माजली आहे.

आरोग्य विभागाच्या नोकर भरतीच्या परीक्षेवरून राज्यात झालेल्या गोंधळावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली. “भविष्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आर्थर रोडच्या तुरुंगात असतील,” अशी टीका पडळकर यांनी केली आहे.

दरम्यान, पडळकर यांनी देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार सुभाषसाबणे यांच्या प्रचारार्थ कारेगाव, बळेगाव, करडखेल, मरखेल, टाकळी, धनगरवाडी, क्षीरसमुद्र, बेंबरा, बिजलवाडी, कावळगाव येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा