प्रेम प्रकरणात कंगनाने अजय देवगणला दिली होती नस कापण्याची धमकी?

मुंबई : बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौत नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. दरम्यान एकेकाळी बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अभिनेता अजय देवगणसोबत कंगना रिलेशमशिपमध्ये असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली होती.

कंगना आणि अजयने ‘वन्स अपॉन ए टाईम इन मुंम्बई’ मध्ये एकत्र काम केलं होत. या चित्रपटाच्या चित्रकरणाच्या दरम्यान तो कंगनाच्या प्रेमात पडला असे सांगितले जाते. मात्र याबाबत कंगना आणि अजयने कधीही भाष्य केल्याने अधिकृतपणे काही समोर आलं नाही.

वृतानुसार, चित्रपटच्या चित्रीकरणाच्या दरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. काजोलला अजय आणि कंगना रिलेशनशिपमध्ये असल्याची बातमी कळताच, तिने अजयला धमकी दिली कि तू कंगनासोबत काम केलस तर मी मुलांसोबत हे घर सोडून निघून जाईन. तसेच आणखी एका वृतानुसार, नंतर कंगना आणि अजयमध्ये वाद एवढ वाढला की, एकदा दिवस नशेत कंगनाने अजयला हाताची नस कापायची धमकी दिली होती. त्यावेळीस अजयने कंगनाला सांगितले, तू जेव्हा नॉर्मल होशील तेव्हा बोलू.
या घटनेनंतर कंगना आणि अजयने त्यांच्यामधील नाते तोडले असल्याचे म्हंटले जाते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा