InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

शिवस्मारकाच्या नावाखाली लोकांचे जीव धोक्यात घालतात; राज ठाकरे यांचा सरकारला टोला

अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या बोट अपघातावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.

“लोकांचे जीव वाचले ही सगळ्यात सुदैवाची गोष्ट आहे. त्याकरिता परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. सरकारकडे पैसे नसताना अशा योजना काढतात आणि लोकांचे जीव धोक्यात घालतात. नुसत्या मोठमोठ्या घोषणा करुन लोकांची फसवणूक सुरु आहे”, अशी टीका राज ठाकरेंनी केली.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.