येत्या 48 तासांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार

राज्यात आठवडाभर दमदार झालेला पाऊस आता धोक्याची पातळी ओलांडतो आहे. या धर्तीवर हवामान विभागाकडून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात पुढील 48 तासात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईतील पावसानं नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. आता मुंबईसह कोकणातही जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवमान विभागाकडून सांगण्यात येतंय.

नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्याच्या भागातही जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली  आहे.सॅटेलाईट इमेजवरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या :-

रिया चक्रवर्तीच्या चौकशीचा त्रास कोल्हापूरच्या तरूणाला , वाचा काय आहे भानगड

मुंबईत अतिजोरदार पावसाचा इशारा ; सर्व यंत्रणा अलर्टवर

स्वातंत्र्य दिनानिमित्त मोदींसाठी लाल किल्ल्यावर कोरोना प्रूफ लेयर

यंदाच्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा ७० टक्के अधिक बरसणार

आधीच कोरोनाने हैराण झालेल्या मुंबईची हवामान खात्याने चिंता वाढवली

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.