महाराष्ट्र बंद : नाशिकमध्ये मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच तुंबळ हाणामारी
- Advertisement -
नाशिकमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांच्या दोन गटांतच हाणामारी झाली. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे आंदोलन स्थळावरील स्टेजवर गेल्याने त्यांचे समर्थक व इतर मराठा आंदोकांमध्ये वाद झाला. क्षणातच बाचाबाचे रुपांतर हाणामारीत झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद जास्त भडकला नाही. सध्या तेथे शांततेत आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे.
‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं
Loading...
Related Posts
- Advertisement -
आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक
Loading...
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला हिंसक वळण लागले आहे. लातूरमध्ये आमदार त्र्यंबक भिसेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्की देखील केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.