उत्तर प्रदेशात माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही, प्रियंका गांधींचे सूचक विधान

लखनऊ : काही दिवसांवर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच उत्तर प्रदेशच्या राजकारणात रोज काही न काही घडताना दिसत आहे. त्यामध्ये भाजपच्या आमदारांचे बंड, समाजवादी पक्षाच्या नेत्यांचे भाजप प्रवेश अशा अनेक गोष्टींनी युपीतले राजकारण चांगलेच तापले आहे. त्यातच आता काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी मोठा राजकीय बॉंम फोडला आहे. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार कोण असणार याचे उत्तर दिले आहे.
यूपीच्या तरुणांसाठी युवा जाहीरनामा प्रसिद्ध करताना एका पत्रकाराने प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री पदाच्या चेहरा कोण? मुख्यमंत्री पदाचा कुणी चेहरा दिसतो आहे का? असा प्रश्न विचारला. यावर प्रियांका गांधी यांनी ‘आता माझा चेहरा दिसत नाही का?’ सगळीकडे मीच तर दिसत आहे. उत्तर प्रदेशात माझ्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे सूचक विधान करून त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
तसेच यूपीमध्ये 20 लाख नोकऱ्या देऊ. त्यापैकी 8 लाख महिलांसाठी असतील. हे कसे करायचे तेही आम्ही कायद्यात सांगितले आहे. 12 लाख पदे अजूनही रिक्त आहेत. आम्ही जॉब कॅलेंडर बनवू आणि त्याचे काटेकोरपणे पालन करू. भरती परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षा देण्यासाठी ट्रेन आणि बसचा प्रवासही मोफत असेल, असेही आश्वासन देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत
- गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत
- पवारांच्या मताशी ‘काँग्रेस’ असहमत; कोल्हेंचा चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा
- ‘कलावंत म्हणून अमोल कोल्हेंनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही, परंतु…’
- अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…