InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पश्चिम बंगालमध्ये भाजपनेच हिंसाचार घडवला – जयंत पाटील

भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकात्यामधील रोड शोमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. या रोड शो दरम्यान दगडफेक देखील झाली. यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले.

आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या घटनेविषयी ट्विट केले आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवत आली आहे, आजपर्यंतचा त्यांचा तसा इतिहासच आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरीत असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे, भाजपावर असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच हिंसाचार घडवून आणत आहे. पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करीत असल्याचेही पाटील यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply