INC | “सरकार आधीच अस्थिर, मंत्रिमंडळ विस्तार झाला तर कोलमडेल”; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

INC | मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. महाराष्ट्रातील शिंदे-भाजप सरकारमध्ये नेमकं काय सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार होणार अशी शक्यता वर्तवल्यानंतरही राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार का होत नाहीये? या प्रश्नांवर काँग्रेसच्या (Congress) माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

“शिंदे गट आणि भाजपमध्ये अनेक आमदार मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून बसले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर दोन पक्षांमधील धुसफूस वाढेल. सरकार आधीच अस्थिर आहे, मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते कोलमडेल”, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

“विधान परिषद निवडणुकांनंतर राज्यात बदलाचे वारे आहेत. महाविकास आघाडीच्या यशामुळे सगळेच बिथरले आहेत. सरकार टिकेल की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी सरकार पडेल आणि मध्यावधी निवडणुका लागू शकतात”, अशी शक्यता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

“विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे यांची शिवसेना पक्षाचे नेते बिथरले आहेत. राज्यात बदलाचे वारे आहे, त्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा सरकार कोलमडण्यासाठी कारण ठरू शकतो”, असे दावाही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या