कचरा गाडीत घेऊन जातायेत मृतदेह माणुसकीला काळिमा फासणारी घटना!

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला आहे. त्यात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील परिस्थिती खूप भयानक झाली आहे. अंत्यसंस्कारासाठीपैसे नसल्याने अनेक लोक नदीत मृतदेह टाकत आहेत. तर काही जण नदीच्या किनाऱ्याला वाळूत पुरत आहेत. बिहारमधील भयावह परिस्थितीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोरोना रुग्णांना घेऊन जाण्यासाठी प्रशासनानेच कचरा गाडीचा वापर केल्याचा नालंदा येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एएनआयनं व्हिडिओ ट्विटर पोस्ट केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं असून संबधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये नालंदा नगरपालिकेचे दोन कर्मचारी कचरागाडीमध्ये रुग्णाला घेऊन जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. नगरपालिकेचे कर्मचारी पीपीई किटमध्ये दिसत आहेत. मात्र, मृतदेहावर फक्त चादर अंथरण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांमाध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नगरपालिकेकडे रुग्णवाहिका आणि पीपीई किट नाही का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा