InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

शहीद जवानांच्या आर्थिक मदतीत वाढ; मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार

- Advertisement -

देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सैन्यातील जवान आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. यानुसार शहीद जवानाच्या नातेवाईकांना 25 लाखांऐवजी एक कोटींची मदत देण्यात येणार आहे. तर जखमी जवानांना 20 ते 60 लाखांपर्यंत मदत दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली कॅबिनेट बैठकीत काल (16 जुलै) हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचे आम आदमी पक्षाने (आप)  कौतुक केले आहे.

“राजकीय सीमा बाजूला ठेवून महाराष्ट्रातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याप्रमाणे शहीद जवानांच्या आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, असे ट्विट आप ने आपल्या ट्विटवर केले आहे. या मदतीमुळे शहीद जवानाच्या कुटुंबाचे नुकसान नक्कीच भरुन निघणार नाही. मात्र या मदतीमुळे त्या कुटुंबाच्या चांगल्या भविष्यासाठी नक्कीच मदत होईल. त्याशिवाय शहीद जवान यासाठी नक्कीच पात्र आहेत, असेही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.”

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.