IND vs AUS | कपिल देवला मागे टाकत रविचंद्रन अश्विनने रचला ‘हा’ इतिहास
IND vs AUS | इंदूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यामध्ये अश्विनने दिग्गज क्रिकेटर कपिल देव (Kapil Dev) यांचा रिकॉर्ड मोडला आहे.
रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास (History by Ravichandran Ashwin)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये अश्विनने 3 विकेट्स घेतल्या आहे. या विकेट्सनंतर त्याने माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांचा 687 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेण्याचा विक्रम मोडला आहे. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट घेणारा अश्विन तिसरा गोलंदाज ठरला आहे.
अनिल कुबळे यांनी टीम इंडियासाठी सर्वाधिक 956 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत. त्यानंतर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हरभजन सिंगचे नाव आहे. हरभजन सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 711 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्स घेतल्यानंतर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर रविचंद्र अश्विनचे नाव आहे. अश्विनच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 689 विकेट्स आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 1 ते 5 मार्च दरम्यान इंदोर येथे खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील चौथा म्हणजेच अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mustard Oil | केसांना मोहरीचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ कंपनीमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Ajit Pawar | “..मग लोक न बोलता जिथं बटण दाबायचं तिथं दाबतात”; अजित पवारांनी भाजपला डिवचलं
- Uddhav Thackeray | “निवडणूक आयुक्त केंद्र सरकारच्या हाताचे बाहुलं” ; उद्धव ठाकरे यांचं म्हणणं सुप्रीम कोर्टालाही पटलं
- Kasba Election | धंगेकारांच्या विजयावर आदित्य ठाकरेंनी दिली प्रतिक्रिया म्हणाले..
Comments are closed.