IND vs AUS | कर्णधार रोहित शर्मा ‘या’ खेळाडूला पुन्हा ठेवणार प्लेइंग-11 मधून बाहेर
IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर मैदानावर पार पडणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे. रोहित ‘या’ खेळाडूंना प्लेइंग-11 मधून पुन्हा एकदा बाहेर ठेवू शकतो.
‘हा’ खेळाडू प्लेइंग-11 मधून बाहेर? (‘This’ player out of the playing-11?)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) झालेल्या पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माने प्लेइंग-11 मधून गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला बाहेर ठेवले होते. कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाने कुलदीपच्या ऐवजी गोलंदाज अक्षर पटेलला संधी दिली होती. तर तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये देखील कुलदीप यादवला संधी मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यामध्ये कुलदीप यादवला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला होता. या सामन्यामध्ये त्याने एकूण 8 विकेट घेतल्या होत्या. त्याचबरोबर त्याने पहिल्या डावात उपयुक्त 40 धावा केल्या होत्या. या सामन्यानंतर त्याला प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले होते.
कुलदीप यादवने आतापर्यंत टीम इंडियासाठी 8 कसोटी सामने खेळले आहे. या सामन्यांमध्ये त्याने 34 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहे, यामध्ये त्याने तीन वेळा एकाच डावात पाच विकेट घेण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. एवढा चांगला रेकॉर्ड करूनही कुलदीप यादवला कसोटी संघातून बाहेर राहावे लागत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | नागपूरमध्ये ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Bhaskar Jadhav | “नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही…”; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर भास्कर जाधवांचा पलटवार
- Sanjay Raut | “इतके घाणेरडी, दळभद्री मनोवृत्तीचे आमचे सहकारी होते”; राऊतांची शिंदे गटावर आगपाखड
- Girish Mahajan | “मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”; महाजनांनी सांगितलं ‘ते’ पेनड्राईव्ह प्रकरण
- Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज
Comments are closed.