IND vs AUS | पुजाराचा नवीन अवतार बघून कर्णधार रोहित शर्मा भडकला, पाहा VIDEO

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यामध्ये चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आक्रमक खेळी खेळण्याच्या नादात बाद झाला आहे. तो चुकीचा शॉट खेळत अवघ्या सात धावांवर बाद झाला आहे. त्याच्या या खेळीनंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) नाराज झाला आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी (IND vs AUS) सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघाचा पहिला डाव 177 धावांमध्ये आटोपला. त्यानंतर भारतीय संघ मैदानावर उतरला होता. भारतीय संघातील के.एल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांनी खराब परफॉर्मन्स दिला आहे.

संघातील एक संयमी खेळाडू म्हणून चेतेश्वर पुजाराची ओळख आहे. मात्र, आजच्या सामन्यामध्ये (IND vs AUS) पुजाराचा नवीन अवतार बघायला मिळाला. नेहमी संथ गतीने खेळी खेळणाऱ्या पुजाराने आज चौथ्या चेंडूवर चौकार मारून सगळ्यांना आश्चर्यचकित केले. मात्र त्यानंतर तो चुकीचा शॉट खेळून बाद झाला. त्याच्या या शॉटनंतर कर्णधार रोहित शर्मा नाराज झाल्याचे दिसून आले आहे. पुजारा बाद झाल्यावर रोहितने त्याच्या पॅडवर बॅट मारून घेतली.

Nagpur Test, Ind vs Aus 1st Test Playing XI

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स केरी, पॅट कमिन्स (C), टॉड मर्फी, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

भारत: रोहित शर्मा (C), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भारत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.