IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने शतक झळकावत इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने 171 चेंडूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले.
कसोटी कारकिर्दीमधील रोहित शर्माचे हे 9 वे शतक आहे. तर कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचे त्याचे हे पहिले शतक आहे. रोहित शर्मा पूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधार पद सांभाळले होते. परंतु त्यांना सर्व फॉरमॅटमध्ये शतक करता आले नव्हते.
‘ही’ कामगिरी करणारा रोहित शर्मा ठरला जगातला चौथा खेळाडू (Rohit Sharma became the fourth player in the world to achieve this feat)
कर्णधार म्हणून रोहित शर्माने न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावले आहे. तर, कर्णधार म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा रोहित शर्मा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी तिलकरत्ने दिलशान, फाफ डुप्लेसिस आणि बाबर आझम यांनी हा पराक्रम केला आहे.
या शतकीय खेळीनंतर रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथला मागे टाकले आहे. रोहित शर्माच्या नावावर आता एकूण 43 आंतरराष्ट्रीय शतक आहेत. सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके झळकवण्याच्या बाबतीत रोहित शर्मा सध्या चौथ्या क्रमांकावर येऊन पोहोचला आहे. या यादीमध्ये विराट कोहली 74 शतकांसह प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.
महत्वाच्या बातम्या
- Nana Patole | “मला शक्तीशाली समजल्याबद्दल…”; राऊतांच्या टीकेला नाना पटोलेंचं सडोतोड उत्तर
- Congress | “कोण रोहित पवार? मला माहिती नाहीत”; काँग्रेसच्या ‘या’ महिला आमदाराची खोचक टीका
- Valentine Day | जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम
- Ashok Gehlot | मुख्यमंत्र्यांनी वाचला जुनाच अर्थसंकल्प; सभागृहात उडाला मोठा गोंधळ
- Nana Patole | “ते मुंबईत येत असतील तर…”; अदाणी प्रकरणावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल