IND vs AUS | कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू मालिकेतून बाहेर

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियातील एक दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेत खेळणार नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये कुलदीप यादवला एकही सामना खेळण्याची संधी मिळणार नाही. या मालिकेमध्ये रविचंद्रन अश्विन (R. Ashwin), रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), अक्षर पटेल (Akshar Patel) या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हन संधी दिली जाणार आहे. या मालिकेमध्ये कुलदीप यादवला बेंचवर बसून इतर खेळाडूंना पाणी द्यावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. नागपूरच्या मैदानावरील खेळपट्टी बघता कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोघांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना नवी दिल्ली येथे 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान खेळण्यात येणार आहे. 1 ते 15 मार्च दरम्यान या मालिकेतील तिसरा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. तरी या मालिकेतील चौथा आणि अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या