IND vs AUS | टीम इंडियासाठी मोठी अपडेट! ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत खेळणार जसप्रीत बुमराह

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच भारतीय दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामने आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियासाठी मोठी अपडेट समोर आली आहे. भारतीय संघातील स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) या मालिकेमध्ये पुनरागमन करू शकतो. बुमराहच्या फिटनेस बाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून जसप्रीत बुमराह दुखापतीला झुंज देत आहे. दुखापतीमुळे त्याला न्युझीलँडविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये सामील होता आले नव्हते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, तो आता पुन्हा संघात पुनरागमन करण्यासाठी सुसज्ज झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसू शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 मार्च पासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेमध्ये जसप्रीत गुमराह संघात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी  तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला संघात सामील केले जाऊ शकते.

इंग्लंड दौऱ्यावर असताना जसप्रीत बुमराहच्या कमरेला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल होते. त्यानंतर बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये देखील तो अनुपस्थित होता. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या