IND vs AUS | रवींद्र जडेजा ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू

IND vs AUS | दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यामध्ये भारतीय फिरकीपटूंनी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन संघाची चांगलीच फिरकी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ 137 धावातच गारद केला आहे.

रवींद्र जडेजा ठरला ‘ही’ कामगिरी करणारा पहिला भारतीय खेळाडू (Ravindra Jadeja became the first Indian player to achieve this feat)

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत होता. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ने टीम इंडियाची ही डोकेदुखी दूर करत उस्मानला 81 धावांवर बाद केले. त्यानंतर एकापाठोपाठ एक ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परत गेले. उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर रवींद्र जडेजाने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 250 विकेट्स आणि 2500 धावा करणारा रवींद्र जडेजा भारतातील पहिला आणि जगातला दुसरा खेळाडू ठरला आहे.

या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या अश्विनने 3, रवींद्र जडेजाने 1 आणि मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने 81 धावांची जबरदस्त खेळी खेळली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून (17 फेब्रुवारी) ते 21 फेब्रुवारी पर्यंत खेळला जाणार आहे. तर या मालिकेतील तिसरा सामना 1 ते 15 मार्च दरम्यान इंदोर येथे होणार आहे. या मालिकेतील चौथा म्हणजेच अंतिम सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या