IND vs BAN | दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियात कुलदीप यादवच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

IND vs BAN | ढाका : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. 22 डिसेंबर रोजी या मालिकेतील दुसरा सामना ढाका येथे खेळला जाणार आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकून, या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघाला दुसरा सामना आपल्या नावावर करून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) मध्ये आपले स्थान मजबूत करायचे आहे.

भारत आणि बांगलादेश दुसरा कसोटी सामन्यामध्ये बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुल (KL Rahul) च्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. दरम्यान, भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये छोटा बदल झाला आहे. भारतीय संघामध्ये प्लेइंग इलेव्हन मधून कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ला वगळण्यात आले आहे. संघामध्ये कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकर (Jaydev Unadakar) ला संधी देण्यात आली आहे. मागच्या सामन्यामध्ये कुलदीप यादवने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. बांगलादेश संघामध्ये मोमिनुल हक आणि तस्किन अहमद यांना प्लेइंग इलेव्हन मध्ये घेण्यात आले आहे. परिणामी संघातील यासीर अली आणि इबादत हुसेन यांना बाकावर बसावे लागणार आहे.

भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यामधील बांगलादेशच्या डावाला सुरुवात झाली आहे. बांगलादेशचे सलामीवीर झाकीर हसन आणि नजमल हसन शांतो ही जोडी खेळण्यासाठी तयार आहेत. झाकीरने पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये शानदार शतक केले होते. त्यामुळे आता बांगलादेशचे लक्ष त्याच्याकडे लागले आहे.

पहिल्या कसोटी सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला होता. रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीनंतर रोहित मायदेशी परतला होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करत होता. सराव सत्रामध्ये केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली. दरम्यान, केएल आता ठीक असून मैदानावर उतरला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.