IND vs BAN | बांगलादेश कसोटी दौऱ्यावर जडेजाच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळू शकते पदार्पणाची संधी

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) न्युझीलँडमध्ये पार पडलेली तीन दिवसीय टी 20 मालिका 1-0 ने आपल्या नावावर केली आहे. तर, पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) तीन दिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. 4 डिसेंबर पासून भारतीय संघाची या दौऱ्यावरील एक दिवसीय सामन्याची सुरुवात होणार आहे. एकीकडे भारतीय संघ या मालिकेसाठी तयारी करत असताना दुसरीकडे संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. अशात रवींद्र जाडेजाच्या जागी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला या कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जडेजा अनेक वेळा एनसीएमध्ये तपासणीसाठी आणि पुनर्वसनासाठी गेला होता. अशात तो बांगलादेशमध्ये होणाऱ्या मालिकेसाठी तंदुरुस्त होण्याची शक्यता नाही. दुखापतीमुळे जडेजा संघातून बाहेर पडल्यानंतर सूर्यकुमार यादवचा संघामध्ये समावेश होऊ शकतो, अशा चर्चा सुरू आहेत. सूर्यकुमारला या मालिकेमध्ये संधी मिळाल्यास तो टी 20 आणि एकदिवसीय नंतर भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करेल. सूर्यकुमारच्या नावाची घोषणा अद्यापही बोर्डाने केलेली नाही.

सूर्यकुमार यादव सध्या जगातील क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज बनला आहे. त्याचबरोबर त्याचे सध्याचे फॉर्म देखील अप्रतिम आहे. त्याचबरोबर त्याने अलीकडे न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यांमध्ये भारताकडून शतकी खेळी खेळली होती. अशात बांगलादेश दौऱ्यावर बोर्ड रवींद्र जडेजाच्या जागी नक्कीच सूर्यकुमार यादवचा विचार करू शकतो.

सध्या रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव हे खेळाडू बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग आहेत.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.