IND vs BAN | बांगलादेश दौऱ्यावरून परतताना मोहम्मद सिराजचे सामान हरवले, ट्विटरवर दिली माहिती

IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) या संघांमध्ये नुकतीच दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिके नंतर भारतीय संघ मायदेशी परतला आहे. मायदेशी परत येत असताना भारतीय संघातील मोहम्मद सिराज (Mohommad Siraj) ला एक वाईट अनुभव आला आहे. बांगलादेश दौऱ्यावरून परत येताना एअर विस्तारा एअरलाइन्सचा प्रवास करत असताना मोहम्मद सिराजचे सामान हरवले आहे. याबाबत त्याने ट्विटरवर माहिती दिली आहे.

मोहम्मद सिराजचे सामान हरवल्यानंतर त्याने एअरलाइन्सला सामान परत मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. कारण त्यामध्ये त्याचे महत्त्वाचे सामान देखील होते. बांगलादेश दौऱ्यावर मोहम्मद सिराजने एकदिवसीय मालिकेत 6 विकेट्स घेतल्या. तर, दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये त्याने टीम इंडियासाठी 7 विकेट्स घेतल्या होत्या.

समान हरवल्याची माहिती ट्विटरवर पोस्ट करत असताना सिराजने लिहिले आहे की,”त्या सामानामध्ये माझ्या आवश्यक वस्तू आहेत. मी तुम्हाला विनंती करत आहे की लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करून मला हैदराबाद मध्ये माझे साहित्य उपलब्ध करून द्या.” यावर एअरलाइन्सने उत्तर दिले आहे. एअरलाइन्स उत्तर देत म्हणाली आहे की,”आम्ही लवकरात लवकर तुमच्या सामानाची माहिती मिळवू.”

डिसेंबरमध्ये भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर होता. दरम्यान, या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. भारताने 2-1 ने एकदिवसीय मालिका गमावली. तर, 2-0 ने दोन सामन्यांची कसोटी मालिका आपल्या नावावर केली.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.