IND vs BAN | बांगलादेश दौऱ्यावर जडेजाच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) डिसेंबरच्या सुरुवातीला बांगलादेश (IND vs BAN) दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशमध्ये भारत तीन वनडे आणि दोन कसोटी सामने खेळणार आहेत. बांगलादेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघामध्ये मोठा बदल झाला आहे. यामध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. जडेजा अजूनही दुखापतीतून पूर्ण सावरलेला नाही. त्यामुळे त्याला बांगलादेश दौऱ्यातून वगळण्यात आले आहे.

बांगलादेश दौऱ्यावर अष्टपैलू खेळाडू रवींद्रच्या जागी शाहाबाज अहमद (Shahbaz Ahmed) चा संघात समावेश करण्यात आला आहे. आता शाहाबाज अहमद बांगलादेशविरुद्ध एक दिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. रवींद्र जडेजा सोबतच यश दयाल (Yash Dayal) च्या जागी गोलंदाज कुलदीप सेन (Kuldeep Sen) चा संघात समावेश करण्यात आला आहे.

रवींद्र जडेजा अजूनही त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला नाही. दरम्यान, तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. जडेजा दुखापट्टीतून अजून पूर्णपणे बरा झाला नसल्याने त्याला संघातून बाहेर पडावे लागले आहे. त्याचबरोबर यश दयाल पाठीच्या खालच्या भागाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. त्यामुळे त्याला देखील संघातून वगळण्यात आले आहे. अशा परिस्थितीत जडेजाच्या जागी शाहाबाज अहमद आणि यशच्या जागी कुलदीपला संघात घेण्यात आले आहे.

कुलदीप सेन हा एक वेगवान गोलंदाज असून 140 प्रतितास वेगाने तो गोलंदाजी करू शकतो. त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एक दिवसीय मालिकेमध्ये स्थान देण्यात आले होते. त्यानंतर कुलदीप आता बांगलादेशविरुद्ध आपली झलक दाखवणार आहे. शाहाबाज अहमद आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) कडून खेळला होता. त्यानंतर त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेत शाहाबाज भारतीय संघाकडून खेळताना दिसला होता. शाहाबाजने भारताकडून 2 सामने खेळले असून त्याने त्यामध्ये 3 बळी घेतले आहेत. पण शाहाबाजला भारतीय संघामध्ये फलंदाजीची संधी अजून मिळालेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.