IND vs BAN | ‘या’ खेळाडूला मिळाला प्लेयर ऑफ द सीरिज अवॉर्ड, तर ‘हा’ खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच

IND vs BAN | ढाका: बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) झालेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने बांगलादेशवर विजय मिळवला. भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आर अश्विन आणि श्रेयस अय्यरने उत्कृष्ट खेळी खेळून संघाला जेतेपदापर्यंत पोहचवले. त्यामुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ‘प्लेयर ऑफ द सीरिज’ खेळाडूची निवड करणे सोपे नव्हते. या मालिकेमध्ये एका खेळाडूने 80-80 धावा केल्या होत्या. मात्र, त्या खेळाडूला हा किताब मिळाला नाही.

बांगलादेशविरुद्ध (IND vs BAN) ‘या’ खेळाडूला मिळाला प्लेयर ऑफ द सीरिज अवॉर्ड

दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या चेतेश्वर पुजाराला प्लेयर ऑफ द सीरिज पुरस्कार मिळाला आहे. पुजाराने पहिल्या सामन्यातील एका डावात 90 धावा तर दुसऱ्या डावात शतक केले होते. मात्र, हा खेळाडू दुसऱ्या सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकला नव्हता. त्याने दुसऱ्या सामन्यांमध्ये केवळ 30 धावा केल्या. असे असूनही त्याला प्लेयर ऑफ द सिरीजचा किताब मिळाला. दरम्यान, या सिरीजमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही श्रेयस अय्यरला यापासून वंचित राहावे लागले आहे.

चेतेश्वर पुजाराने या मालिकेमध्ये 222 धावा केले आहेत. तर श्रेयस अय्यरने या मालिकेमध्ये 202 धावा आपल्या नावावर केले आहे. अय्यरने पहिल्या सामन्यामध्ये 86 तर दुसऱ्या सामन्यामध्ये 87 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातील शेवटच्या डावामध्ये अय्यरने 29 नाबाद धावांची खेळी खेळली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघ सामना जिंकला होता. असे असताना देखील श्रेयस अय्यरच्या ऐवजी चेतेश्वर पुजाराला प्लेयर ऑफ द सिरीज हा किताब मिळाला आहे.

या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा किताब अश्विनने जिंकला आहे. अश्विनने या सामन्यामध्ये एकूण सहा बळी घेतले होते. त्याचबरोबर त्याने दोन्ही डावांमध्ये एकूण 54 धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाला विजय पथापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने 42 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्याच जोरावर अश्विनला मॅन ऑफ द मॅच किताब मिळाला.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.