IND vs BAN | रोहितनंतर केएल राहुल जखमी, कोण होणार टीम इंडियाचा कर्णधार?

IND vs BAN | मीरपुर : भारतीय संघातील खेळाडूंना दुखापतीचे ग्रहण लागले आहे. भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) पहिल्या कसोटी सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जखमी झाला होता. रोहितच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्या दुखापतीनंतर रोहित मायदेशी परतला होता. मुंबईला परतल्यानंतर रोहितने तज्ञांची भेट घेतली होती. तज्ञांनी आणि डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये रोहित अनुउपस्थित होता. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करत होता. मात्र आता केएल राहुल पण दुखापतग्रस्त झाल्याच्या समोर आले आहे.

सराव सत्राच्या दरम्यान केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली आहे. तो सध्या ठीक असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तो जर ठीक नसला, तर भारतीय संघाला त्याच्याशिवाय खेळावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरपूर येथे गुरुवारपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. सामन्यापूर्वी सराव सत्रामध्ये केएल राहुलला दुखापत झाली. रोहित शर्मा दुखापतीमुळे आधीच कसोटी सामनातून बाहेर पडला आहे. त्यानंतर त्याच्या जागी भारतीय संघाचे नेतृत्व करणारा केएल राहुल देखील सध्या जखमी झाला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाचा कर्णधार पुन्हा बदलेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मीरपूर येथे फलंदाजीचा सराव करत असताना थ्रो-डाऊन घेताना, केएल राहुलच्या हाताला चेंडू लागल्याने तो जखमी झाला आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी माध्यमांशी बोलताना केएलच्या दुखापती बद्दल दिलासा दिला आहे. ते म्हणाले आहे की,”केएलची दुखापत फारशी गंभीर दिसत नाही. तो बरा दिसत आहे. आम्हाला वाटतं आहे, की तो लवकर बरा होईल. डॉक्टर सुद्धा त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. तो लवकरच तंदुरुस्त होईल.”

भारतीय संघ केएल राहुलच्या दुखापतीनंतर पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मानंतर केएल राहुल संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, केएल राहुलची दुखापत जर गंभीर असेल, तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये संघाचे नेतृत्व कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.