IND vs BAN | शुभमन गिलने केले कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक

IND vs BAN | चट्टोग्राम: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. बांगलादेश मधील चट्टोग्राम मैदानावर हा सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात 404 धावा केल्या. तर बांगलादेश संघ त्यांच्या पहिल्या डावात फक्त 150 धावा करू शकला. अशात भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. या डावामध्ये भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubhaman Gill) ने शतकीय खेळी खेळली आहे. शुभमन गिलचे हे कसोटी कारगिर्दीतील पहिले शतक आहे.

शुभमन गिलने या शतकीय खेळीमध्ये 149 चेंडू मध्ये 104 धावा केले आहेत. यामध्ये त्याने दहा चौकार आणि दोन षटकार लगावले आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजाराने 22 धावांची खेळी खेळली. भारतीय संघाने 49 षटकांमध्ये 177 धावा केल्या आहे. यामध्ये भारतीय संघाचा एक गडी बाद झाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि गिल यांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 55 धावांची खेळी खेळली. तर संघाचा कर्णधार केल राहुल 23 धावा करून बाद झाला.

दरम्यान, बांगलादेश येथील चट्टोग्राम मैदानावर पाच विकेट घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या सामन्यामध्ये कुलदीप ने 16 षटके गोलंदाजी करत चाळीस धावा दिल्या असून पाच विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने मशफिकुर रहिम, शाकिब अल हसन, नुरूल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन यांना पव्हेलियनला पाठवले. भारताकडून चट्टोग्राम मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावात भारतीय संघाने या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत 133.5 षटकांमध्ये 404 धावा केल्या. यामध्ये श्रेयस अय्यर, चेतेश्वर पुजारा आणि रविचंद्र अश्विनी यांनी अर्धशतके केली. त्याचबरोबर ऋषभ पंत आणि कुलदीप यादव यांनी देखील अनुक्रमे 46 आणि 40 धावांचे योगदान दिले. दरम्यान, भारतीय संघाने बांगलादेशचा पहिला डाव 55.5 शतकामध्ये आटोपला. यामध्ये भारतीय संघाने बांगलादेशला सर्वबाद करत 150 धावांवर थांबविले. यामध्ये कुलदीप यादवने भारतासाठी सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.