IND vs BAN | शेवटच्या सामन्यात 9 धावा करत बाद झाला ऋषभ पंत, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

IND vs BAN | ढाका: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यामध्ये पहिल्या डावात यजमानांनी 227 धावा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देत भारतीय संघाने पहिला डाव 314 धावांवर संपवला. तर दुसऱ्या डावांमध्ये केवळ 231 धावात बांगलादेश संघ बाद झाला. अशाप्रकारे भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करण्यासाठी 145 धावांचे लक्ष मिळाले.

दरम्यान, या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघातील खेळाडूंच्या विकेट पडत गेल्या. तर, या कठीण परिस्थितीमध्ये दुसऱ्या डावात रिषभ पंत (Rishabh Pant) ला फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. तो या डावामध्ये देखील फ्लॉप ठरला. या डावामध्ये पंत 9 धावा करत बाद झाला. त्याने 13 चेंडूमध्ये केवळ 9 धावा केल्या. त्याच्या या खेळीनंतर चाहते त्याच्यावर प्रचंड संतापले आहेत.

ऋषभ पंतने  मैदानावर येताच संथ खेळण्याऐवजी वेगवान खेळी खेळण्यास सुरू केली. अशा परिस्थितीमध्ये तो 9 धावा करत बाद झाला. रिषभ पंतच्या रुपाने मेहदीला पाचवा बळी मिळाला. ऋषभ पंतच्या या खेळीनंतरच्या चाहते त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.