IND vs BAN | सामन्यामध्ये उतरताच जयदेव उनाडकरने रचला ‘हा’ विक्रम

IND vs BAN | ढाका: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून खेळला जात आहे. या सामन्यामध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) च्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये जयदेव उनाडकर (Jaydev Unadakar) चा समावेश करण्यात आला आहे. जयदेव उनाडकरला अनेक वर्षांनी कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. तर, त्याने या सामन्यामध्ये एक मोठा विक्रम केला आहे.

2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत जयदेव उनाडकरने भारतासाठी एकमेव कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. आता तब्बल बारा वर्षानंतर उनाडकर पुन्हा एकदा कसोटी सामन्यांमध्ये सामील झाला आहे. त्याने गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याला बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

या सामन्यासाठी उनाडकर मैदानात उतरताच त्याच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे. एका कसोटी सामन्यापासून दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत सर्वात जास्त सामन्यांना मुकणारा जयदेव उनाडकर दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने 2010 मध्ये कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो आता 2022 मध्ये कसोटी सामना खेळत आहे. दरम्यान, 12 वर्षांमध्ये त्याला एकूण 118 सामन्यांना मुकावे लागले आहे.

जयदेव उनाडकरचे तब्बल 12 वर्षानंतर भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमन झाले आहे. जयदेव उनाडकरचे 2010 मध्ये कसोटी सामन्यामध्ये पदार्पण झाले होते. मात्र, जयदेवला त्यावेळी फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामना खेळला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.