IND vs BAN | BCCI आगामी सामन्यात रोहित शर्माच्या जागी ‘या’ खेळाडूला देणार संधी
IND vs BAN | टीम महाराष्ट्र देशा: भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेमध्ये काल भारताला सलग दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. बांगलादेश विरुद्ध दुसरा सामना खेळताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत देखील रोहितने 51 धावांची खेळी खेळली. पण तरीही भारतीय संघाला या सामन्यांमध्ये विजय मिळवता आला नाही. बांगलादेशने पाच धावांनी हा सामना आपल्या नावावर केला. या सामन्यांमध्ये बांगलादेशची फलंदाजी सुरू असताना दुसऱ्या षटकात झेल घेत असताना रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा या अंगठ्याच्या दुखापती नंतर भारतात परतणार आहे.
बांगलादेश विरुद्ध सुरू असलेल्या या मालिकेतील तिसरा सामना 10 डिसेंबर रोजी चितगाव येथे होणार आहे. दरम्यान, या सामन्यांमध्ये आणि 14 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्याच्या मालिकेमध्ये रोहित शर्माची जागा कोण घेणार याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. कारण अंगठ्याच्या दुखापतीनंतर रोहित शर्मा मायदेशी परतणार आहे.
चट्टोग्राम येथे १४ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यासाठी रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरला संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘अ’ कसोटी मालिकेत अभिमन्यू ईश्वरने एकावर एक शतके केली होती. त्याचबरोबर अभिमन्यू ईश्वर एक सलामीवीर म्हणून उत्तम कामगिरी करत आहे. अशावेळी त्याला ‘अ’ कसोटी संपल्यानंतर चट्टोग्रामच्या सामन्यासाठी संघात सामील केले जाऊ शकते.
अभिमन्यू ईश्वर रोहितच्या जागी संघात आल्यावर कसोटी सामन्यात भारतीय संघाला कोण सलामी देईल? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या सामन्यांमध्ये कर्णधार के ल राहुल आणि शुभमंग गेले हे सलामीवीर असतील की ईश्वर सलामीवीर म्हणून मैदानावर उतरेल?
रोहित शर्मा सोबतच भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीच्या जागी उमरान मलिक किंवा मुकेश कुमार त्याची जागा घेऊ शकतात. कारण मोहम्मद शमी सध्या दुखापतग्रस्त आहे. त्याचबरोबर गुडघ्याचे शस्त्रक्रियेनंतर एकही सामना न खेळलेला रवींद्र जडेजा आता कसोटी सामन्यांमध्ये खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Grapes Benefits | हिवाळ्यात द्राक्षे खाल्याने मिळतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Sharad Pawar | “…मग एकतर्फी निकाल लागणारच”; गुजरात निकालावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य
- Gujarat Election Results 2022 | पूल कोसळून १३४ जणांचा बळी गेलेल्या मोरबीमध्ये भाजप उमेदवार विजयी!
- World Test Championship | काय करणार BCCI?, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयपीएल 2023 फायनल एकाच वेळी
- Sanjay Raut | “शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने…”; संजय राऊतांचा आरोप काय?
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.