IND vs IRE | ‘या’ तारखेला भारतीय संघ जाणार आयर्लंड दौऱ्यावर

IND vs IRE | टीम महाराष्ट्र देशा: जुलै 2023 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 3 वनडे, 5 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला आयर्लंड विरुद्ध टी-20 सामने खेळायचे आहे. या टी-20 समान्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

The first T20 match against Ireland will be played on August 18

18 जुलै 2023 पासून टीम इंडिया आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यामध्ये तीन टी-20 सामने खेळले आहे. आयर्लंडविरुद्ध पहिला टी-20 सामना 18 ऑगस्ट, दुसरा टी-20 सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा टी-20 सामना 23 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.

दरम्यान, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडिया पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. टीम इंडिया पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चा पहिला आणि अंतिम सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे दोन सामने कोलकत्ता आणि मुंबई येथे खेळले जाणार आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 48 सामने खेळले जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NsLz5i