IND vs NED T20 World Cup | केएल राहुल बाद नव्हता! रोहित स्वार्थी कर्णधार, सोशल मीडियावर टीका
IND vs NED T20 World Cup | T20 विश्वचषक 2022 चा 23 वा सामना भारत आणि नेदरलँड्स यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या रोमांचक सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 1 गडी गमावून 32 धावा केल्या. सलामीवीर केएल राहुलला पचांनी बाद दिले. मात्र तो बाद नव्हता. रोहित शर्माने DRS घ्यायला नकार दिला. त्यामुळे राहुलला तंबूत परतावे लागले.
वैन मीकरमनने सहाव्या षटकात केवळ चार धावा दिल्या. या षटकात चेंडूचा रिप्ले दाखवण्यात आला ज्यावर केएल राहुल बाद झाला. चेंडूकडे पाहिल्यावर मधल्या यष्टीला न आदळता चेंडू जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. राहुल यांनी DRS घ्यायला हवा होता. पण रोहित शर्माने नकार दिला. त्यामुळे स्वार्थी कर्णधार म्हणून रोहितवर सोशल मीडियावर टीका होत आहे.
KL Rahul was not out , he asked Rohit Sharma to take review but he denied 😡😡 . Selfish Captain Rohit Sharma should be kicked out of the team. pic.twitter.com/l1MeopShai
— PRIYANSHU (@_PriYansHu_11) October 27, 2022
जेव्हा-जेव्हा भारतीय संघाने विश्वचषकात नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. 2011 मध्ये भारताने विजेतेपद आपल्या हातात घेतले होते, तर 2003 मध्ये ते उपविजेते होते. मात्र भारताची आजची फलंदाजी स्लो असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन्ही संघाचे खेळाडू-
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि दीपक हुडा.
नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (c&wk), मॅक्स ओ’ डाऊड, विक्रमजीत सिंग, बास डी लीड, टॉम कूपर, कॉलिन एकरमन, टिम प्रिंगल, लोगान वैन बीक, टिम गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल वैन मीकरेन, शरीझ अहमद, वैन डर मर्व्ह, ब्रँडन ग्लोव्हर आणि स्टीफ मायबर्ग.
कुठे पाहता येईल सामना-
भारत आणि नेदरलँड्स T20 विश्वचषक सुपर 12 सामने डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहता येतील. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील T20 विश्वचषक सुपर 12 सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
महत्वाच्या बातम्या :
- NTRO Job Alert | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये NTRO विविध पदांसाठी बंपर भरती
- Eknath Khadase | “…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी
- IND vs NED T20 World Cup | भारताला पहिला झटका! केएल राहुल बाद
- Pakistan | “…तर 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेतून पाकिस्तान बाहेर जाऊ शकतो”
- Bank of Baroda Recruitment | बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.