IND vs NED T20 World Cup | भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजीचा निर्णय

IND vs NED T20 World Cup | पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाचा उत्साह उंचावला असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज नेदरलँड्सला हरवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. नेदरलँडचा संघ पहिला सामना हरला आहे. बांगलादेशने नेदरलँड्सचा 9 धावांनी पराभव केला. अशा स्थितीत हा सामना जिंकण्याचा नेदरलँडचा प्रयत्न असेल. मात्र, हा सामना त्यांच्यासाठी सोपा नसेल, कारण भारताकडे अनुभव आणि पाकिस्तानवर विजय मिळवल्याचा उत्साह आहे. दरम्यान भारताने टॉस जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

जेव्हा-जेव्हा भारतीय संघाने विश्वचषकात नेदरलँड्सचा पराभव केला आहे, तेव्हा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. 2011 मध्ये भारताने विजेतेपद आपल्या हातात घेतले होते, तर 2003 मध्ये ते उपविजेते होते.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11-

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल आणि दीपक हुडा.

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (c&wk), मॅक्स ओ’ डाऊड, विक्रमजीत सिंग, बास डी लीड, टॉम कूपर, कॉलिन एकरमन, टिम प्रिंगल, लोगान वैन बीक, टिम गुगेन, फ्रेड क्लासेन, पॉल वैन मीकरेन, शरीझ अहमद, वैन डर मर्व्ह, ब्रँडन ग्लोव्हर आणि स्टीफ मायबर्ग.

कुठे पाहता येईल सामना-

भारत आणि नेदरलँड्स T20 विश्वचषक सुपर 12 सामने डीडी स्पोर्ट्सवर विनामूल्य पाहता येतील. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील T20 विश्वचषक सुपर 12 सामन्याचे थेट प्रक्षेपण (भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.