IND vs NZ | कोण कोणावर भारी?, जाणून घ्या हेड-टू-हेड सामन्यातील आकडेवारी

टीम महाराष्ट्र देशा: हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ (Team India) आपल्या नवीन कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) च्या नेतृत्वाखाली ऑकलँडला पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेमधील पहिला सामना फक्त सिडनी पार्क, ऑकलँड येथे खेळायला जाईल. टी-20 मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया आनंदात आहे. कारण ही मालिका दोन्ही देशातील एक दिवसीय सामन्यांच्या आकडेवारीची पुष्टी करते. या आकडेवारीनुसार टीम इंडियाने टी-20 न्यूझीलंडला मागे सोडले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या हेड-टू-हेड सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघाचा रेकॉर्ड चांगला आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 110 एक दिवसीय सामने खेळले आहे. त्यापैकी भारतीय संघाने 55 सामने आपल्या नावावर केले असून न्युझीलँड ने केवळ 49 सामने जिंकले आहेत. या दोन्हीमध्ये एकच गोष्ट साम्य आहे, ती म्हणजे या दोन्ही संघाने पाच सामने निकालाविना संपवले आहेत.

टीम इंडियाने होम सिरीज व्यतिरिक्त न्युझीलँड विरुद्धची मालिका गाजवली आहे. भारतीय संघाच्या देशांतर्गत आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर भारतीय संघाने 26 सामने जिंकले आहे म्हणजे न्युझीलँडपेक्षा एक सामना जास्त जिंकला आहे. त्याचबरोबर भारतीय संघाने घराबाहेर 14 सामने जिंकले आहेत. तर न्युझीलँडने यामध्ये 8 सामने जिंकले आहेत. न्यूट्रल वेन्यूमध्ये न्युझीलँडने 16 सामने जिंकले आहे तर भारताने 15 सामने आपल्या नावावर केले आहे. यामध्ये नक्कीच न्यूझीलंड संघाचा पलडा भारी आहे.

न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ)  एक दिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ 

न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या भारताच्या एक दिवसीय मालिकेमध्ये शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (डब्ल्यूके), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, चहलदीप उमरान मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.