IND vs NZ | टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर कोण करेल फलंदाजी?, विराट की सूर्यकुमार

टीम महाराष्ट्र देशा: सध्या न्यूझीलंडमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघाने हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली 1-0 ने आघाडी घेतली आहे. या मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. तर या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने 65 धावांनी विजय मिळवला होता. दुसऱ्या टी 20 सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास पाठवले होते. यामध्ये सूर्यकुमारने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले होते. तेव्हापासून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सूर्यकुमार यादवला क्षेत्ररक्षण देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय संघाच्या तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर सध्या सुरू असलेल्या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अशा स्थितीत व्यवस्थापन तिसऱ्या क्रमांकावर कोणाला खेळायची संधी देणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. विराट कोहली टीम इंडियात परतल्यावर तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजीसाठी उतरेल? हा प्रश्न कर्णधार आणि व्यवस्थापन दोघांनाही पडणार आहे. विराट कोहली टीम इंडियासाठी सतत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसत आहे. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. विराट कोहली जगातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू ठरला आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात खराब फॉर्ममुळे विराटच्या खेळी बाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.

सूर्यकुमार बाबत बोलायचे झाले तर सूर्यकुमार सध्या मैदानावर येताच वेगवान खेळी खेळायला सुरुवात करत आहे. सूर्यकुमार यादवने टी 20 फॉर्मेटमध्ये धावांचा पाऊस पडला आहे. सध्या सूर्यकुमारची सरासरी 45 च्या वर आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 1000 हून अधिक धावा केले आहेत. दरम्यान सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे. सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट ही 181 वर आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर उतरवून व्यवस्थापना समोर मोठा प्रश्न उभा केला आहे. अशा स्थितीत टीम इंडिया तिसऱ्या क्रमांकावर कुणाला खेळण्याची संधी देईल याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.