IND vs NZ | टीम इंडियाने 1-0 ने जिंकली न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका

नेपियर: न्यूझीलंडच्या नेपियर येथील मैदानावर आज भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) च्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेमध्ये 1-0 ने विजय मिळवला आहे. आजच्या सामन्यामध्ये न्युझीलँड संघाचा कर्णधार टीम साऊदी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मेडिकल अपॉइंटमेंटमुळे केन विलियम्सन आजचा सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी संघामध्ये मार्क चॅपला स्थान देण्यात आले होते. न्यूझीलंडने भारताला 161 धावांचे लक्ष दिले होते.

न्युझीलँडने दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली होती. सलामीवीर ईशान किशन, ऋषभ पंत आणि त्याचबरोबर श्रेयस अय्यरला देखील आज चांगली कामगिरी करता आली नाही. ईशान किशन आणि पंतने अनुक्रमे 10 आणि 11 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर 0 वर बाद होत पॅव्हेलियनला परतला. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी हा सामना पुढे नेला. पावर प्ले मध्ये या दोघांनी 56 धावा केल्या. तर मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार यादवला बाद व्हावे लागले. यानंतर पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे हा सामना तिथेच थांबवण्यात आला. दरम्यान, 9 षटकांमध्ये 76 धावांची गरज असताना टीम इंडियाच्या 75 धावा झाल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, सामना बरोबरीत सुटला आणि 1-0 ने ही मालिका भारतीय संघाच्या नावावर झाली.

या सामन्यामध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी न्युझीलँड संघाच्या फलंदाजावर दबाव आणत शेवटच्या 5 षटकात 30 धावांमध्ये 8 गडी बाद केले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ही मालिका आपल्या नावावर केली आहे.

या सामन्यांमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांना चांगलीच धूळ चाखली आहे. यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. या दोघांनीही प्रत्येकी 4 गडी बाद केले आहे. यामध्ये अर्शदीपने 4 षटकात 37 धावा देत 4 बळी घेतले आहे. तर दुसरीकडे हर्षल पटेलने देखील 1 गडी बाद केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.