IND vs NZ | डब्ल्यू मॅचमध्ये उमरान मलिकने केला कमाल, घेतली ‘या’ खेळाडूंची विकेट

ऑकलँड: ऑकलँडमध्ये भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना पार पडला. या सामान्यादरम्यान देखील भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) चा खराब फॉर्म कायम आहे. तर दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) याने आपले डेब्यू सामन्यांमध्ये कमाल केला आहे. वनडेमध्ये पदार्पण करताच उमरने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या एक दिवशी सामन्यामध्ये उमरान मलिकने न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हिड कॉनवे याला बाद करत आपल्या डेब्यू सामन्यांमध्ये आपला वनडे कारकिर्दीमधील पहिला बळी घेतला. उमरानने टाकलेल्या चेंडूवर वेगवान शॉट मारण्याच्या प्रयत्नामध्ये ऋषभ पंतने डेव्हिड कॉनवेला झेलबाद केले. त्यानंतर डेव्हिड कॉनवे उमरान मलिक च्या वनडे कारकिर्दीतील पहिला बळी ठरला आहे.

डेव्हिड कॉनवेला बाद केल्यानंतर उमरानने न्यूझीलंडचा इन फॉर्म बॅट्समन डॅरिल मिशेल याचीही विकेट घेतली आहे. उमरानने डॅरिल मिशेलला आपल्या वेगवान गोलंदाजीने चकित करून सोडले आहे. उमरानने आतापर्यंत या सामन्यात दोन बळी घेतले आहे. उमरानला भारतीय संघामध्ये सामील करण्याची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान, त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या एक दिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली. आणि त्याने या संधीचा पुरेपूर उपयोग केला आहे.

उमरान मलिक सोबतच अर्षदीप सिंगने देखील आकलँडमध्ये आपल्या कारकिर्दीतील पहिला एकदिवसीय सामना खेळला आहे. हर्षदीप सिंग आणि उमरान मलिक यांना कर्णधार शिखर धवन आणि प्रशिक्षण व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दोन्ही पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना कॅप दिली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण उमरानला तर शिखर धवनने अर्श दिपला पदार्पणाची कॅप दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.