IND vs NZ | “पंतला आता विश्रांती देण्याची…”; संजू सॅमसनला संघातून वगळल्याने शशी थरूर संतापले

क्राइस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये तीन एक दिवसीय मालिकेतील तिसरा सामना सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंड संघाने आपल्या नावावर केला असून दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. तर, आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये तिसरा व अखेरचा सामना खेळायला जात आहे. हा सामना क्राइस्टचर्च येथे खेळला जात आहे. आजच्या सामन्यामध्ये संजू सॅमसन (Sanju Samson) ला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, संजूला आजच्या सामन्यातून वगळण्यात आले आहे. संजू सॅमसंग पुन्हा एकदा भारतीय संघामध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे. यामुळे क्रिकेट चाहते नाराजी व्यक्त करत आहे. अशा परिस्थितीत केरळमधील काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी संजूला संघातून वगळल्यामुळे प्रश्न उपस्थित केला आहे.

शशी थरूर यांनी बुधवारी सकाळी ट्विट करत भारतीय संघाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. या ट्विटमध्ये शशी धरून म्हणाले आहे की,”ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर चांगली खेळत खेळी असून त्याला पाठिंबा देणे गरजेचे आहे, असे व्हीव्हीएस लक्ष्मणने म्हटले आहे. पण सध्या पंत फॉर्ममध्ये नाही. मागील 11 सामन्यांमध्ये 10 डावात तो अपयशी ठरला आहे. तर, दुसरीकडे संजू सॅमसनची एक दिवसीय सामन्यातील सरासरी 66 इतकी आहे. त्याचबरोबर गेल्या पाच सामन्यांमध्ये त्याने चांगल्या धावा केल्या असून, तो सध्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आला आहे. याबद्दल क्रिकेट व्यवस्थापनाने विचार केला पाहिजे.” या ट्वीटमध्ये शशी थरूर यांनी संजू सॅमसंग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांना टॅगही केलं आहे. पुढे शशी थरूर म्हणाले आहेत की,”पंतला आता विश्रांती देण्याची गरज आहे. तर संजूकडून आणखी एक संधी हिरावून घेण्यात आलेली आहे. संजूला आता आपली फलंदाजी दाखवण्यासाठी आयपीएलची वाट बघावी लागणार आहे.”

एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये ऋषभ पंतच्या तुलनेत संजू सॅमसनची कामगिरी उत्तम आहे. संजूने आत्तापर्यंत 11 एक दिवसीयसामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 10 डावांमध्ये 66 च्या सरासरीने 330 धावा केल्या आहेत. संजूची कामगिरी पंतपेक्षा चांगली असल्यामुळे क्रिकेटच्या चाहते नाराजी व्यक्त करत आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये संजू सॅमसनला संधी न दिल्यामुळे शिखर धवनने त्याला पहिल्या एकदिवसीय सामन्यात संघात स्थान दिले होते. या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) अपयशी ठरल्यानंतर संजू आणि श्रेयसने टीम इंडियाचा डाव सावरला होता. अशा परिस्थितीत अतिरिक्त गोलंदाज खेळण्यासाठी संजू सॅमसनला वगळण्यात आले असून त्याच्या जागेवर दीपक हुड्डा (Dipak Hooda) ला संधी देण्यात आली.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.